IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती.

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती. नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय भरती. महाराष्ट्राचे पुणे यांचे कार्यालय मार्फत थोडक्यात जाहिरात देण्यात आलेली आहे. 2025 ची ही पहिली जाहिरात आहे जे की प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरावयाची सुविधा यांनी जी लिंक दिलेली आहे की यांचा करार आयबीपीएस या कंपनीकडे झालेला आहे तरीही पदभरती परिपूर्ण आयबीपीएस हीच कंपनी कम्प्लीट करणारी असेल, ती प्रक्रिया सविस्तर जाहिरात जे काही यांचं ऑफिशियल पोर्टल आहे आणि नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक मुद्रा नियंत्रक पुणे यांच्या कार्यालयावर जाहिरात उपलब्ध करून देण्यात येईल त्यांनी म्हटलेलं ही पद भरती शिपाई पदासाठी आहेत. आणि गट ड चि ही पदभरती आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जाहिरात क्रमांक -01/2025
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं 1222/प्र.क्र.54/का.13 अ दिनांक 4 मे 2022, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/ प्र.क्र. 136/ का- 13 दिनांक 21 नोव्हेंबर 2022, महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांचेकडील पत्र क्रमांक आस्थाप-2021/448/प्र.क्र.92/म-1 दिनांक 19.05.2022, दिनांक 22.11.2022 आणि दिनांक 07.12.2022, महसूल व वनविभाग यांचेकडील पत्र क्रमांक आस्थाप-2023/1030/प्र.क्र.211/म-1 दिनांक 24.06.2024 आणि दिनांक 22.11.2022 अन्वये विहित तरतुदी आणि निर्देशानुसार नोंदणी व मुद्रांक विभागात गट ड (शिपाई) संवर्गाची नोंदणी व मुद्रांक विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदांची भरती करीता प्रस्तूत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

जाहिरात क्र.: 01/2025
एकूण: 284 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 शिपाई (गट ड) 284
Total 284

 

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज [Starting: 22 एप्रिल 2025]  Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

 

शैक्षणिक  योग्यता: 10वी उत्तीर्ण.
वयाची योग्यता: अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : पुणे
फी: 
1)  खुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹900/-
2)  माजी सैनिक फी माफ राहील.

महत्त्वाच्या तारखा: 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक  :  22.04.2025

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत 

दिनांक : 10.05.2025 

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक :  (परीक्षेच्या आधी 7 दिवस )

अर्ज करण्यासाठीची महत्वाची सूचना – 

  1. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक खरी माहिती भरणे आवश्यक बंधनकारक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरुपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा
  2. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रुपरेषा / वेळापत्रक/परीक्षाकेंद्र/ बैठक क्रमांक . बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही
  3. उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल

     4. ऑनलाईन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक

       अमरावती, लातुर, मुंबई आणि कोंकण विभागातील खालील नमुद विविध शहरांमध्ये केले जाईल.

   

  1. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे. 
  2. अर्ज मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे. संक्षिप्तपणे (Abbreviations) अद्याक्षरे (Initials) देता संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या /पत्याच्या दोन भागांमध्ये एका स्पेसने जागा सोडावी
  3. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे
  4. एस. एस. सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत. त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी

     

Leave a Comment