शेतकरी बातमी:-
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ५० हजार रूपये देण्याचे जाहिर करण्यात आले. मागील वर्षभराच्या काळात पात्र शेतकऱ्यांकच्या खात्यावर दोन टप्प्यांत पैसे देण्यात आले गेले. पण आजूनही काही पात्र लाभार्थ्यांना या जाहीरनाम्याचा लाभ मिळाला नाही. म्हणूनच राज्य सरकारने तिसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे व लवकरच पात्र लाभार्थ्यांना खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.
यात रेगुलर कर्जाची परत फेड करणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नव्हता. तसेच एकच वर्षात दोन वेळा उचल दिसत असल्याने तेही लाभार्थी शेतकरी या योजनेचा फायदा घेवू शकले नाहीत.या बाबात सरकारने दोन वेळेस उचल घेणाऱ्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ सरकारने दिला आहे, याबाबत सरकारने सविस्तर माहिती मागितली आहे.
त्यामूळे काल दिनांक २९ फेब्रुवारी ला जिल्हा उपनिबंधक कार्यालयात विभागीय सहनिबंधक अरूण काकडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. यात रेगुलर कर्जाची परत फेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा झाला. पण काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकरयांना याचा लाभ मिळाला नाही. एकाच वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पण ५० हजार लाभ मिळणार.
पंजाबराव देशमुख व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी मार्चपूर्वीच कर्जाची परतफेड करत असतात. मात्र, हे करताना एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसल्याने त्या लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळालाच नव्हता.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन ही तांत्रिक अडचण सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे, राज्य शासनाने अध्यादेशात अंशता बदल करण्यात आला. या निर्णयामुळे १४ हजार ८०० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळानार आहे.