MSRTC Bharti कोणतीही परीक्षा नाही एस टी महामंडळामध्ये भरती पगार ३० हजार.
MSRTC Bharti : तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल व आयटीआय कोर्स केला असले मग तुमच्यासाठी एक खास संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली असुन. भरती सातारा विभागासाठी होणार आहे .नुकतीच एस. टी. महामंडळाने अधिसूचना जाहीर केली आहे.
यामध्ये अप्रेंटीस शिकाऊ प्रशिक्षणार्थी या पदाच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यात येतील .तेव्हा पदांसाठी इच्छुक व पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घ्या….,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२३
पदे आणि पदसंख्या
मोटार मेकॅनिक वाहन – ४० जागा
मेकॅनिक डिझेल – ३४ जागा
मोटार वाहक बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ३० जागा
ऑटो इलेक्ट्रिशियन – ३० जागा
वेल्डर – २ जागा
टर्नर – ३ जागा
प्रशितन व वातानुकुलिकरण – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४५ जागा
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार किमान दहावी वा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा व त्याने संबधित ट्रेड मधील आयटीआय कोर्स पूर्ण केलेला असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केलीली आहे ती बघावी.
वेतन – (मासिक)-
मोटार मेकॅनिक वाहक – ८ हजार ५० रुपये
मेकॅनिक डिझेल – ७ हजार ७०० रुपये
मोटार वाहक बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – ७ हजार ७०० रुपये
ऑटो इलेक्ट्रिशियन – ८ हजार ५० रुपये
वेल्डर – ७ हजार ७०० रुपये
टर्नर – ८ हजार ५० रुपये
प्रशितक व वातानुकुलिकरण – ७ हजार ७०० रुपये
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती –
ऑनलाइन व ऑफलाइन
अर्जाची प्रत ऑफलाइन पाठविण्यास पत्ता – विभाग नियंत्रक कार्यालय , ७ स्टार बिल्डिंग च्या मागे , एस. टी. स्टॅण्ड , रविवार पेठ, सातारा – ४१५००१
अर्ज प्रक्रिया:-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/fullpage/19
या भरतीकरिता ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. वर दिलेल्या सरकारच्या अप्रेंटीस नोंदणी वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी झाल्यावर अर्जाची प्रत संबधित पत्त्यावर पाठवायची. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.