सरकारी नोकरी:-
सरकारी नोकरी हे आजकालच्या तरुणांचे जीवनाचे एक मोठे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवापाड अभ्यास करून मनापासून प्रयत्न करतात. आजकालच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. गाव सोडून, शहर सोडून आजकालचे तरुण मोठ मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यासासाठी आपले प्रयत्न करतात.
रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र करून मनापासून अभ्यास करतात. ते हेच विचार करून की आज ना उद्या सरकारी नोकरी निघेल आणि त्यासाठी मी अप्लाय करेल व पास होऊन माझे स्वप्न पूर्ण होईल.
फसवेगिरी :-
आज कालच्या मोबाईलच्या युगात, कॉम्प्युटरच्या युगात लोकांची फसवीगिरी ही वाढली आहे. काही बातम्या ह्या फेक निघत आहेत.
त्यामुळे तरुणांनी सावधगिरी बाळगून त्या बातमीची योग्य ती पडताळणी करावी व मगच त्यावर अंमलबजावणी करावी.
फेक बातमी:-
त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांनी ४२०८ कॉन्स्टेबल पद व ४८२सब इन्स्पेक्टर या पदाची जाहिरात काढली होती.
मिनिस्टर ऑफ रेल्वे यांच्यातर्फे ही जाहिरात दाखवण्यात आली. पण हे जाहिरात फेक निघाली आहे. त्याचा पाठपुराही रेल्वे बोर्डाने केला आहे. व ही बातमी फेक असल्याची जाहीर केले आहे.
सावध राहा:-
त्यामुळे तरुणांनी सावध होण्याची गरज आहे. आजकालच्या युगात तरुणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक चालली आहे. फॉर्म ही शंभर हजार दोनशे ठरविण्यात येते. उमेदवार आपला चान्स जाऊ नये म्हणून ती फी भरून त्या पदाला अप्लाय करतात. त्या फॉर्मला अप्लाय करतात व त्यांची इथेच फसवणूक होते.
त्यासाठी उमेदवारांनी प्रॉपर वेबसाईट चेक करावी. त्याची फेर तपासणी करावी.
पुढील काळात अशाच गोष्टी जास्त होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी. त्या बातमीची पडताळणी करूनच त्यावर अंमलबजावणी करावी.