सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट याची

सरकारी नोकरी:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकारी नोकरी साठी लागणारे कागदपत्रे व त्यासाठी लागणारे बाकी डॉक्युमेंट याची सविस्तर माहिती आपण आता घेऊ ,खरंतर सरकारी नोकरी म्हणलं की दहावी बारावी ग्रॅज्युएशन चे मार्कशीट आणि बोनाफाईड तसेच रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा मेळ घालून सरकारी नोकरीला अप्लाय करायला जायचे.आता हे दिवस बदलले आहेत. खरंतर काळानुसार नोकऱ्यांचे महत्त्व बदलले आहे. गरज ही बदलली आहे.

सरकारी नोकरीचे पद:-

पदानुसार आपले शिक्षण किती झाले. आहे व त्या पदासाठी योग्य शिक्षण किती पाहिजे. यानुसार आपल्याला 8वी, 9वी 10वी,12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन,डॉक्टर, इंजिनियर, इत्यादी वर्गाचे सर्टिफिकेट म्हणजेच मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट त्या त्या पदांनुसार आवश्यक आहे. अधिक कोणता डिप्लोमा झाल्या असल्यास त्या डिप्लोमाची सर्टिफिकेट आपल्यापाशी पाहिजे.

सरकारी नोकरी साठी लागणारे वय:-

मित्रांनो प्रत्येक पदांनुसार प्रत्येक पदाला वयाची लिमिट असते. त्यानुसार आपले वय दाखवणारे योग्य ते कागदपत्रे आवश्यक आहे. जसे की शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, आधार कार्ड, पॅन कार्ड,बर्थ सर्टिफिकेट
इत्यादी योग्य ती कागदपत्रे आपल्यापाशी उपलब्ध पाहिजे.

सरकारी नोकरीसाठी लागणारे जातीचे वर्गीकरण:-

सरकारी नोकरीत प्रत्येक जातीनुसार त्या त्या वर्गात रिझर्वेशन दिलेले आहे त्या आरक्षणाला त्या आरक्षणाचेच जात प्रमाणपत्र किंवा कास्ट सर्टिफिकेट लागते जसे की SC,ST, OBC,EWS, OPEN हे सर्व कास्ट सर्टिफिकेट तहसीलदार म्हणजेच तहसील ऑफिस मधून काढून ठेवलेले हवे.

राज्याची किंवा देशाची रहिवासी प्रमाणपत्र:-

राज्याची किंवा देशाची रहिवासी प्रमाणपत्र काढणे आजकाल आवश्यक आहे हे सरकारी नोकरीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे आहेत हे आपण आपल्या तहसील ऑफिसमधून काढून घ्यावे लागते. किंवा नेट कॅफे मधून काढून घ्यावे रहिवासी प्रमाणपत्र हा एक आपला ओळखीचा पुरावा आहे.

कॅम्पुटर सर्टिफिकेट किंवा टायपिंग सर्टिफिकेट:-

सहसा आजकाल ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. कोणत्याही नोकरीत कॅम्पुटर साठी किंवा टायपिंग सर्टिफिकेट मागितले जाते.कॅम्पुटर सर्टिफिकेट व टाइपिंग सर्टिफिकेट हे दोन्हीही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे यात वेगळे मानून घेण्यासाठी काही नाही. ही काळाची गरज झाली आहे.

फोटो सही बोटाचा ठसा:-

कोणत्याही नोकरी लागल्या करताना फोटो सही तसेच बोटाचा ठसा हा मागितला जातो. तो स्कॅन करून किंवा ऑफलाईन म्हणजेच समोरासमोर घेतला जातो फोटो हे सहा महिन्याच्या आतले लेटेस्ट घेतले जातात.

अपंग सर्टिफिकेट:-

काही कारणामुळे आपल्या शरीरात अपंगत्व असल्यास त्याचा पुरावा म्हणून योग्य त्या हॉस्पिटलमधून योग्य त्या अधिकाऱ्याकडून आपण आपले अपंगत्व सर्टिफिकेट काढून घ्यावे. ते 10 टक्के, 20 टक्के, 40 टक्के, 50 टक्के असे टक्केवारीत मागितले जाते व आपल्याला दिले जाते.

विवाहित असल्यास:-

विवाहित असल्यास विवाहित असल्याचा पुरावा तसेच लहान कुटुंबाचा पुरावा लहान कुटुंबाचा पुरावा हा हस्तलिखित मागितला जातो.विवाहित असल्याचा पुरावा पण हस्तलिखित मागितला जातो किंवा ग्रामपंचायत मधून विवाहित असल्याचा प्रमाणपत्र आपल्याला भेटते ते आपण आपल्यापाशी काढून ठेवावे व लहान कुटुंबाचा पुरावा आज तागायत तरी हस्तलिखितच मागितला जातो.
तसेच लग्न झाल्यावर महिलांचे नाव किंवा आडनाव बदलले असल्यास त्याचाही पुरावा मागितला जातो. त्यासाठी विवाहित प्रमाणपत्र पुरेशी ठरते तसेच बर्थ सर्टिफिकेट महिलांसाठी चालते. किंवा शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

महत्त्वाचे कागदपत्रे:-

शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र, शैक्षणिक पासिंग प्रमाणपत्र, शैक्षणिक बोनाफाईड, जात प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल दृष्ट्या प्रमाणपत्र, कॅम्पुटर पासिंग सर्टिफिकेट, टायपिंग सर्टिफिकेट, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदान कार्ड, विवाहित प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, विधवा , प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे सरकारी नोकरीचा फायदा घेण्यासाठी आवश्यक आहे ते आपल्या योग्यतेनुसार आवश्यक आहेत.

Leave a Comment