महाराष्ट्र जलसंपदा विभाग परीक्षा निकाल जाहीर:-
जलसंपदा विभागांतर्गत ची गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागांतर्गतीच्या सात परिमंडळातील चौदा संवर्गातील एकूण चार हजार 4497 पदाच्या सरळ सेवा भरती करिता पात्र उमेदवार कडून विभागाच्या या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने 3/11/ 2023 ते 24/11/2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते.
सदर पदाच्या भरती करिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.
ही परीक्षा 27, 29, 31 डिसेंबर 2023 आणि 01, 02 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा जाहीर निकाल आता जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केला आहे.
प्रस्तुत परीक्षेमधून खालील परिमंडळ निहाय पदे भरावयाची होती. अमरावती परिमंडळ, छत्रपती संभाजी नगर परिमंडळ, नागपूर परिमंडळ, नाशिक परिमंडळ, पुणे परिमंडळ, कोल्हापूर परिमंडळ, मुंबई परिमंडळ असे एकूण सात परिमंडळात ची परीक्षा घेण्यात आली होती.
यात एकूण 14 पदावर परीक्षा घेण्यात आली होती.
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्न श्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भू वैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक ,दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भंडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक.
या सर्व पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.
निकाल पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
ह्या लिंक वर क्लिक करून उमेदवारांनी आपला रिझल्ट पाहावा प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पीडीएफ दिलेली आहे तरी उमेदवारांनी आपल्या पदाची पीडीएफ पाहून त्यावर क्लिक करून view ऑप्शन वर जाऊन आपला निकाल पाहावा.